All Round Development

Through Climbing!

16

Team Members

97

Climbing Expeditions

12

Years Of Experience

10

Awards

आम्ही गिर्यारोहक (एक प्रवास)


माळशेजमध्ये १२०० फूट waterfall rappelling. फी ८०० रुपये. बस्स.. एव्हढी जाहिरात वाचली आणि ताडकन उडी मारली. इतके दिवस ज्या साहसाच्या शोधात होतो, ते मिळाल्याचा आनंद होता. साल असावं २००३. Camp मध्ये भेट झाली ती एका फार मोठया माणसाची. अरुण पुरुषोत्तम सावंत! पुढील ५ वर्षे ह्या फार मोठया व्यक्तीबरोबर राहून जेव्हढे काही शिकता येईल तेव्हढे शिकण्याचा प्रयत्न केला. Dukes Valley crossing camp ८०० फूट, Lingana Valley crossing camp, Rappelling camp, Bhimachi Kathi, Burma Bridge १५० फूट, Karnala Valley crossing camp, Sandhan Valley crossing आणि Giant swing असे खूप camp केले. खूप काही शिकलो सरांकडून. माझ्यासाठी अरुण कधीच ‘सर’ नव्हता. एक वेगळंच नातं होतं ते. गुरु, मित्र, बंधू, आदर्श ही सगळी नाती त्यात होती. खूप शिकलो. असे हे camping चालूच होते आणि मग जाणीव झाली की गिर्यारोहण क्षेत्रात climbing प्रकार हे अजून सुद्धा एक कठीण आव्हान आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी आम्ही ७ जण एकत्र आलो. विनय, हर्षद, जयेश, गिरीश, स्नेहल, शीतल, राज. अर्थात सरांचा आशीर्वाद होताच. Birthday पार्टीची खूप मोठी बिलं पाहून एक दिवस विचार केला की असा वायफळ खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून climbing साठी सामान घेऊ आणि आपण climbing ला सुरुवात करू. मला वाटतं हीच सुरुवात होती "आम्ही गिर्यारोहक" ची!

पहिली मोहीम इरशाळ गडावर. अर्थात मित्रांचं सामान घेऊन केली. नंतर पैसे जमवून पहिले rope खरेदी करून गणेश - कार्तिक. त्या नंतर गरज भासू लागली ती सरावाची कारण इथून पुढे आव्हानं उत्तरोत्तर कठीण होत जाणार होती. सरावासाठी लांब जायची गरज नव्हती. मुंब्रा नर्सरी! मी आणि विनय रोज दुपारी मुंब्र्यात जाऊन सराव करू लागलो. सरावामध्ये तंत्र सुधारणे हे एक उद्दिष्ट असे. Weekend आणि सुट्टीच्या दिवशी इतर members पण join व्हायचे. ह्याच दरम्यान अजून एका मोठया व्यक्तीची ओळख झाली. किरण अडफडकर! Climbing क्षेत्रातील अग्रगण्य नाव. स्वत:च्या हिम्मतीवर उभं राहिलेलं व्यक्तिमत्त्व. सर्वांपेक्षा एक वेगळेपण जपणारं असं हे नाव. Climbing क्षेत्रात धडपड करणाऱ्यांसाठी ह्यापेक्षा दुसरं आदर्श नाव असूच शकत नाही. बस्स बस्स बस्स.. आता मागे वळून बघायची गरजच नव्हती. इरशाळ, गणेश - कार्तिक, लिंगाणा, हरिश्चंद्रजवळील शेंडी, वानरलिंगी, देवनीची अयशस्वी मोहीम, रायगडचा टकमक टोक, माहुलीतील नवरी, करवली, भालदार, करंगळी, Hot dog, वजीर, चंदेरी समूह, पालीचा सरसगड, तैलबैलाच्या भिंती, भांबुर्डे येथील सुळके, डांग्या, हदबीची शेंडी, अंजनेरी नवरा नवरी, पहिने नवरा नवरी, हनुमान, नाणेघाट, कलगोंडा, मच्छिंद्र, माळशेजमधील लिंग्या, लोणावळ्याच्या नागफणी, कलावंतीण, भैरवची भिंत, माथेरानमधील Landscape, Echo point wall, Louisa अशा एक ना अनेक मोहिमा सुरु झाल्या. नवीन join होणाऱ्या लोकांसाठी ह्या सुळक्यांवर काही ठिकाणी दोनदा तर काही ठिकाणी चक्क तीनदा सुद्धा मोहिमा घेण्यात आल्या. हे सर्व चालू असताना equipment ची कमतरता जाणवू लागली. पर्यायाने पैशांचीसुद्धा. त्यासाठी विही waterfall rappelling, Dukes rappelling, कोंढाणा caves, ताम्हिणी rappelling, गणपती गडद येथून पहिल्यांदा केलेला rappelling camp, तसेच इतर अनेक treks आणि activities घेण्यात आल्या. तसेच कुठल्याही group ला event साठी technical support देणं इत्यादी कार्य ही चालू होती. एखादया group बरोबर जाऊन एखादया किल्ल्यावर श्रमदान करणे इत्यादी गोष्टी होऊ लागल्या, events आणि मुंब्र्यात सराव हे करत असताना नवनवीन लोकं येऊ लागली. भेटू लागली आणि team बनू लागली.

अभिषेक वैद्य, सुमुख सातवळेकर, त्रिवेणी केसकर, अमोल पाध्ये, वेदिका अष्टेकर, प्रतिक पाटील, तुषार भंगाळे, नेहा शेठ, प्रविण हाडवळे, पल्लवी भोर, पनवेल येथील “निसर्ग मित्र” चे राहुल, विश्वेष आणि team असे आणि अनेक लोकं येऊ लागली. नवीन लोक, नवीन विचार, नवीन संकल्पना या उक्तीला सार्थ असे काही उपक्रम चालू झाले. हिमालय trek, रूपकुंड, Humpta Pass, मिझोराम trekking आणि caving तसेच जलोरी पास cycling, गोवा cycling असे उपक्रम चालू झाले आणि ते अव्याहत चालू देखील आहेत. ह्या आतापर्यंतच्या प्रवासात खूप जण आले, गेले, काही जणांना कामाच्या व्यापामुळे तर काहीना संसारी व्यापामुळे “आम्ही गिर्यारोहक” बरोबर राहणं जमेनासं झाला. तरी सगळे मनाने आजही आमच्याबरोबर आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून खूप लोकांनी आर्थिक व मानसिक बळ दिलंय. सर्वांची नावं इथे देणं शक्य नसलं तरी “आम्ही गिर्यारोहक” च्या प्रत्येक member ला त्याची जाणीव आहे. सर्वांचे आभार. तसेच “आम्ही गिर्यारोहक” team मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांचे स्वागत. स्वत: शिका आणि दुसऱ्याला पण शिकवा. अर्थात चांगल्या गोष्टी. मला जे येतंय ते माझ्याबरोबर असणाऱ्याला आलंच पाहिजे. ह्या क्षेत्राकडे छंद म्हणून बघाच. पण नुसतं छंद म्हणून बघू नका तर आपला सर्वांगीण विकास कसा होईल ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. माझं management skill, माझी लेखण शैली, माझं वक्तृत्व कसं सुधारेल हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचं आहे. ह्या क्षेत्राकडे डोळसपणे बघीतल्याने आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच सकारात्मक होतो. सह्याद्रीत आल्याने स्वत: बद्दलची कमीपणाची भावना संपून जाते. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वादळाला सामोरे जाण्याची ताकद मिळते ती सह्याद्रीतूनच. कितीही संकटे येवोत, माझ्यासारखे असेच उभे रहा. हेच तर सांगत असतो सह्याद्री ओरडून. आपण लक्ष देणं गरजेचं आहे. चला तर मग स्वत:चा सर्वांगीण विकास करण्यासाठी “आम्ही गिर्यारोहक” च्या प्रवासात सामील होऊया.


“एकच ध्यास, climbing मधून सर्वांगीण विकास!”


- राज बाकरे

Why Us?


With so many organizations planning treks, trips and adventure events, we claim that our group stands out in multiple ways :




Passionate Adventure Enthusiasts

We are all passionate adventure enthusiasts, managing practically secured professions and yet dedicatedly finding time and energy to pursue what we worship. So being with us means you do not miss upon the responsibilities of your job, but can make the escape time from routine, remarkable.

Quality Of Organization

Quality of Organization is of paramount importance to us. We plan every event understanding that you are looking for newer experiences as well as safety getting to the destination and back! This includes transport arrangement, meals, equipment and guidance.

Quality Planning

Our schedules have quality planning, i. e., we plan taking into account the season, the weather, the geology, the strength and stamina of our participants, natural phenomena, cultural events and instantaneous crowd density at the event location.


Our Friends & Partners


Activities

Check Our Activities

Climbing

It is not the mountain we conquer,
but ourselves...

Cycling

Side effects may include sweating,
euphoria and general awesomeness...

Trekking

In every walk with nature
one receives more than he seeks...

Rappelling

If it scares you,
it might be a good thing to try...

Social Work

We are not in it for the income,
we are in it for the outcome...

Online Sessions

We may not be doing great things,
but small things in a great way...

Team

Check Our Team

Raj Bakre

President

Abhishek Vaidya

Secretary

Sumukh Satavlekar

Finance Officer

Contact

Contact Us

Our Address

Pendse Nagar, Dombivli (East) - 421201, Maharashtra, India

Email Us

amhigiryarohak@gmail.com
satsumukh@gmail.com

Call Us

Raj Bakre: +919821383868
Sumukh Satavlekar: +919967598275

Loading
Your message has been sent. Thank you!