बाण ची मोहीम झाल्यावर आम्ही गिर्यारोहकची टीम तशी आळसावलेलीच होती..प्रजासत्ताक दिन जवळ आला तरी काही प्लान ठरत नव्हता..शेवटी एकमेकांना उकसवत प्लान ठरला एकदाचा..घेरा सरसगड येथील 3 सुळके.. तशी मोहिम सोपी असल्यामुळे मोहीमेच नेतृत्व नविन टीम कडे देण्याचे ठरले.
नुकताच वधू संशोधनात यशस्वी झालेल्या प्रतिक पाटलाकडे मोहिमे ची सूत्र देण्यात आली... सुरवातच गोंधळा पासून झाली.. घेरा सरसगड सुळके आणि गुऴाच्या ढेपा ह्यातच गोंधळ...वेगवेगळ्या ठिकाणच्या माहितीतून मिळालेल्या वेगवेगळ्या वाटा गोंधळात अजूनच भर टाकत होत्या.. शेवटी गणपती पाली ह्या गावा मागे असलेले सुळके निश्चित केले...25 जानेवारीला रात्रीत पाली जवळ असणार्या झापवाडीत 10 जणांची टीम पोहचली..
ह्याच झापवाडीतून तीनही सुळक्यांच्या पायथ्याशी कुठलीही साधने न वापरता अगदी तासाभरात पोहचता येते.. पाणी वाडीतूनच घेऊन जावे) थंडीमुळे टीम ची सकाळ थोडीशी उशीरा च उगवली.. चहा पाणी उरकून तासा भरात पायथ्या ला टिम पोहचली..
पायथ्याला पोहचताच आमच्या टीम मधे एक पोट टीम असल्याचे लक्षात आले..टीम चे नाव होते कच्चा लिंबू..अर्थात ह्या कच्चा लिंबूं काढण्याचा पहिला उद्देश सिनीयर टीम आणि ज्युनियर टीम ह्यांच्या मधली अनुभवाची दरी कमी करण्यासाठी असावा असे एकूण कच्चा लिंबू ह्या टीमच्या वर्तानातून जाणवले.मग काय...
GS-2 ह्या सुळक्याची जबाबदारी ह्याच कच्चा लिंबू टिम कडे देण्यात आली.. त्रिवेणी केसकर..(कच्चा लिंबू ची सर्वेसर्वा) हया लीड करणार होत्या तर त्यांना सूरक्षा दोर पुरवणार होत्या त्यांचाच टीमच्या पल्लवी भोर..आणि त्याना मार्गदर्शन होते वरद पवार ह्यांचे..तर सरसगडा पासून लांब असणार्या GS-3 ह्या सुळक्या साठी सुमुख सातवळेकर लीड घेणार होते.त्यांचे सेकंड मॅन म्हणून स्वत: नेत्याने सुरक्षा दोर हातात धरला..
GS 2 वर चढाई करताना त्रिवेणी केसकर
दोन्ही सुळक्यांचे आरोहण खिंडीतूच होते..सुमुख ने आरोहणास सुरवात केली...3 बोल्ट एक पिटॉन एक पेग पार करत सुमुख हळूहळू माथ्या च्या दिशेने सरकू लागला..उन्हामुळे डिहायड्रेट झालेल्या सुमुखची चांगलीच दमछाक झाली होती.. ते त्याच्या हालचालीं मधून जाणवत होत..शेवटी पाण्याविनाच सुमुख ने माथा गाठला..मागोमाग नेता प्रतीक ने देखील टॉप बिले वर क्लाईंब करत माथा गाठला..तर रवि खोसे ने झूमार करत माथा गाठला.ढेपा समजून अंदाज बांधलेला GS-3 हा सुळका क्लाईंबगसाठी दमदार तर होताच शिवाय मानसिक आणि शारीरीक कसोटी पाहणारा होता..160 फूट आरोहणाची उंची भरली होती. तिघांनी ध्वजारोहण करून पुन्हा खिंडी चा रस्ता धरला ...तो पर्यंत कच्चा लिंबू टीम ने GS-2 चा माथा गाठण्यात य़श मिऴवले होते..माथा गाठताना ह्या टीम ने उपलब्ध असलेल्या नैसर्गिक अँकर चा पुरेपूर फायदा घेतला..
GS 3 वर चढाई करताना सुमुख सातवळेकर
आता आव्हान होते ते सरसगडा जवळ असणार्या GS-1 सुळक्याचे.. ह्याचे आरोहण बेस पासून होते. परंतु अनायसे GS-2 च्या टॉप वर असल्यामुळे अभिषेक वैद्य आणि राहूल खोत ह्यांनी वरूनच GS-1 आणि GS-2 ह्यांच्या मधे असलेल्या चोक स्टोनवर उतरण्याचा निर्णय़ घेतला. ह्या सुळक्यावर ऩैसर्गिक अँकर बरेच असून देखील फारसे उपयोगाचे नव्हते. अवघ्या काही मिनिटात 2 पेगच्या सहाय्याने अभिषेक वैद्यने माथा गाठला. ह्या सर्वांची क्षणचित्रे टिपण्याचे काम पराग सरोदे आणि रवि खोसे अगदी मन लावून करत होते..वाईंडअप करून उतरे पर्यंत नेहमी प्रमाणे उशीर झालाच..आणि मग गावांत उतरेपर्यंत अंधारात केलेली कसरत..सकाळी ट्रेक करताना सगळ्यांनाच खाजखुजली ने आपली चुणुक दाखवली होती.आणि रात्री अंधारात उतरताना मात्र खाजखुजली ने पूर्ण सिनेमा च दाखवला..सुमुख वर तर चक्क सगळे कपडे काढून नाचायची वेळ आली..सकाऴी लवकर न उठण्या ची शिक्षा निसर्गाने सर्वांनाच खाजखुजलीच्या रूपाने दिली होती.....
GS 1 वर चढाई करताना अभिषेक वैद्य
टीम..
मोहिमेचा नेता प्रतिक पाटील.
उपनेता त्रिवेणी केसकर.
पल्लवी भोर.
वरद पवार.
पराग सरोदे.
राहूल खोत.
अभिषेक वैद्य.
सुमुख सातवळेकर.
रवि खोसे.
राज बाकरे..
टीम आम्ही गिर्यारोहक..
