Articles and Blogs

Ganesh - Kartik Climbing, Kalyan - Oct 12, 2014

Published on February 01, 2015 by Spruha Satavlekar

Kartik Outer Wall


दसऱ्याच्या equipment पूजेनंतर इतक्यातच वाळलेल्या मुंब्र्याच्या boulders वर मोजक्या दिवसात सराव करून, गणेश-कार्तिक या कल्याण जवळील twin pinnacles (200 ft each) वर चढाई करण्याची मोहिम आखली गेली. सुमारे 3-एक तासांचा 7 km च्या पल्ल्याचा वाट चुकण्यालायक ट्रेक असल्यामुळे climbing day शक्य तितका वाचवण्यासाठी रात्रीच चालत बराचसा रस्ता पार करून खाली गावाजवळ विश्रांती घेऊन पहाटे पूढे जावे असे निश्चित झाले. त्याप्रमाणे मलंग गडापासून जवळपास दीड किलोमीटर वर असलेल्या कुशवली या base village ला जाण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर, 2014 रोजी रात्री निघण्याचा बेत पक्का झाला व टीम finalize केली गेली.


रात्री सुमारे ११ पर्यंत पायथ्याशी पोहोचून एका नेहमीच्या काकांना सोबत वाट दाखवायला येण्याची विनंती केली आणि त्यांच्यासोबत झपाझप ट्रेक करत तासाभरात बरीच ऊंची पार करुन विश्रांतीसाठी थांबलो. क्लाइम्बिंग च्या सामनाच्या जड जड bags काही क्षण खाली टेकवून गप्पा मारत सगळे ताजेतवाने झालो. रात्रिचा trek असल्यामुळे रस्त्यात तब्बल 4 bamboo pit vipers दिसले हो! त्यांचे फोटो काढले आणि परत थेट तासाभराने शिखरांच्या पायथ्याजवळील गावी एका घराच्या आवारात अंथरुणं घालून पसरलो! ट्रेक मधेच वेळ जाणार, झोपायला काय मिळतंय या अंदाजाचा आमच्याच fast trekking करण्याने हिशोब लावला आणि proper bedding शिवाय कुडकुडत झोपवं लागलं. :P


पहाटे इथेच अमोल च्या हातचा गरमागरम चहा पिउन आम्ही बारक्या झाडांतून वरती वाट काढत climbing base ला पोहोचलो. Eye क्लाइम्बिंग करून route ठरवल्यावर अभिषेकने कार्तिक outer face विश्वेश सोबत करायचे, त्यांचं सुरु होताच सुमुख आणि अमोलने गणेश व कार्तिक inner faces सुरु करायचे असे ठरले. तोस्तोवर सामनाची बांधाबांध करायला घेतली आणि सेकंड man ची bag भरून थोडंफार jam-पोळी रोल्स चा नाश्ता झाला. पोटोबा झाल्यावर आपापली तयारी करून पहिल्या बोल्ट ला anchoring केलं आणि दगडांच्या विठोबाला कार्यक्रम यशस्वी आणि सुरक्षितपणे पूर्ण करवून घे असं साकडं घालून लाइन मधले वीर सज्ज झाले.


अगदी आखीव-रेखीव अशा भरभक्कम कातळावर छोट्या छोट्या ग्रिप्स आणि फूटहोल्डस्च्या सहाय्याने belayer विश्वेशला कॉल देत अभ्या चढू लागला. सुरुवातीला जणू काही या मोठ्ठाल्या पायऱ्या आहेत आणि पाय चुकणारच नाही असा confidently चालणारा अभ्या जसजसा height gain होऊ लागला, तसतसा थोडा जास्त careful होताना दिसू लागला. सुमारे 50 एक फुट झाले, त्यानंतर थोडासा डाविकडे जाण्याच्या धडपडीत झर्रकन् गडगडत जवळच्याच बोल्ट पाशी अभ्याने फॉल घेतला आणि practice कमी झाल्यामुळे tension येतंय हे लक्षात आल्यावर स्वत:ला 4 शिव्या हासडून तो परत same route try करू लागला. शिव्यांतून मिळणाऱ्या प्रोत्साहनाचं गूढ बहुतेक adrenaline चा जीवंत अनुभव घेण्यासाठी धडपडणाऱ्यांनाच कळत असावं. विनय, विश्वेश आणि त्रिवेणी अशी आमची कॅमेऱ्याची तिहेरी कडी असल्यामुळे हा epic फॉल मस्तपैकी विडीओबद्ध करता आला आहे. त्यानंतर पुढच्या खेपेला मात्र जोर लगा के हय्या करत न तडफडता अभ्याने चढाई फटाफट पूर्ण केली.


Kartik Inner Wall


आता वेळ होती ती base team ने base गणेश-कार्तिकच्या मधल्या patch ला शिफ्ट करण्याची! अभ्याच्या मागोमाग विश्वेशचे jumaring सुरु झाले. मगासच्या tricky patch वरची विश्वेश बुवांची मूव बघून मग parallely सुमुख आणि अमोल यांनी गणेश-कार्तिक inner face चढाईसाठी तयारी सुरु केली. त्यांच्यासोबत पाणी वगैरे सामान घेऊन विनय, राज, मी, सर्वेश, वासु, प्रतिक, मानसी, प्रणव आणि प्रसाद सगळे डाविकडल्या traverse वर आलो. या ठिकाणी खाली मोठा पेग आहे आणि पहिला दहा फुटांचा पल्ला ओलांडताच एक बोल्ट आहे. तिथपर्यंत जाऊन next चोकस्टोन ला जाण्यासाठी डाव्या sideला गणेशच्या वॉल वर अमोल चढू लागला. मोठ्ठाल्या चिकेस्टोनवर पोहोचताच त्याने रोप anchor करून सुम्याला आणि राजला तिथपर्यंत घेतले.


Ganesh Inner Wall


हे 30-40 ft पार झाल्यावर आता उजवीकडचा कार्तिक अमोलची, तर डावीकडचा गणेश सुमुखची वाट पाहताना दिसू लागला. एका बोल्ट ला fix करून पुढच्या बोल्ट च्या दिशेने आगेकूच करणं अशा safety ची कधी कधी guarranty नसते, कारण बोल्टिंग type, quality, किती wear and tear आहे, proper बोल्ट आहे की pitton किंवा peg आहे, weight सांभाळू शकेल का हे सगळे विचार करावे लागतात. आता काही ठिकाणी प्रस्तारारोहाणाच्या याही आव्हानाला तोंड देत अमोलने राजच्या सल्ल्याने safety ensure करून सुमुख ने दिलेल्या belay सोबत चढ़ाई सुरु केली आणि बघता बघता टॉप झाला! एव्हना विश्वेश वरती पोहोचलाच होता. 3 कॅमेरे कमी की काय, म्हणून त्याने summit वरून mobile वर selfi वगैरे घेत टॉप angle नेही अमोल आणि सुम्या चे climb टिपले! त्यानंतर अभ्या rappelling च्या तंत्राने कार्तिकच्या आतील बाजूने मध्यावर उतरला. त्याने belay सेट केला आणि सुमुखचे डावीकडील गणेश climbing सुरु झाले. कातळारोहणात route निवडताना अजून एक आव्हान असते: to judge yourself. आपल्याला ही वाट जमेल का, की अजुन एखादा सोपा मार्ग आहे, हे बहुश: eye climbing नेही कळते, पण कधी कधी पुढे जाऊन परत मागे वळून नवा प्रयत्न करण्याची जिद्द ही ठेवावी लागते. अगदी शेवटच्या 50 ft टप्प्यात सुमुखची धडपड खालून (प्रेक्षक म्हणून) पाहताना ते लक्षात येत होते.


सुमुखचा टॉप होइतो मग पुढे विश्वेश खाली आला. एकेक करून आलेल्या सर्वांना climbingची किमान झलक मिळावी म्हणून आधाराला एक rope पकडत शिवाय belay च्या सहाय्याने pulling टाळून कार्तिकच्या टॉप पर्यंत सर्वांना नेण्यात आले! 270 degrees मध्ये exposed असतानाही पहिल्यांदाच येऊनही सगळ्यांनी हे आव्हान पेलले! मीपण मध्यावरून jumaring चा मागील (could have been) अपघाती incident पाठी टाकण्याच्या अट्टहासाने jumar pair चा वापर केला आणि वरती अमोलला भेटले. समोर सुमुखचं U टाकून rappelling सुरु असताना दिसत होतं. Last मी असल्यामुळे selfi काढून चटाचट मला rappel मारायला लावत अमोलनेपण या बाजूच्या wind up ची तयारी सुरु केली. अगदी दहा ते पंधरा मिनटात सगळे baseपाशी पोचलेले होतो आणि थोड्याच वेळात coil मारून परतीच्या ट्रेकला लागलो.


परतताना कालच्या घरासमोर चहा-खाऊ झाल्यावर गणेश-कार्तिक यांच्या पल्याड अस्तास जाणारा सूर्य पाहताना काय खास वाटला म्हणून सांगू! उतरणीच्या ट्रेकवर शेवटपर्यंत गायलेली असंख्य 'संपूर्ण' म्हणजे बरेचदा musicसकट वाली 'संपूर्ण' गाणी.. खालच्या घरात प्यायलेलं मनसोक्त पाणी आणि अचानक जुळून आलेलं या वाक्यातलं यमक यांनीच या storytelling ची तूर्तास सांगता करत आहे. त्या (could have been) अपघाती incident च्या वेळची धम्माल आणि थरार लवकरच वाचायला ready होईल, आम्ही गिर्यारोहक वर!