माहुली म्हणजे सह्याद्रीतल्या प्रस्तारारोहकांची माऊली! या माऊलीच्या ओढीने मागील वर्षीच्या 'करंगळी' आणि 'भालदार' या शिखरांनंतर २०१५ मधील मोहिमेसाठी 'आम्ही गिर्यारोहक' टीम सज्ज झाली, ती १७ तारखेला 'Hot Dog' सर करण्यासाठी!
कृष्णा pinnacle शेजारील Hot Dog चे climb सुरु होते त्या inner face च्या base पर्यन्त पोहोचतानाच आम्हा base team मंडळींना पुढील आव्हनाची झलक मिळाली होती! त्यामुळे आपल्या climbers ना तयारीसाठी मदत करताना प्रत्येकाने सावकाश जा, सांभाळून जा असे आपापल्या परीने शुभेच्छा देऊन झाले. राज आणि गुरु दादाच्या सोबतीने पाहणी केल्यावर कृष्णाचे bolting न सापडल्यामुळे केवळ hot dogच करू असा निर्णय घेऊन अभिषेक, सुमुख आणि अमोल तयार झाले आणि roles decide झाल्यावर दगडांच्या देवाला वंदन करून क्लाइम्बिंग ला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला सहजी सापडणारे आणि पुढे फक्त climber च्याच नजरेस पडतील अशा एकेक बोल्ट च्या सहाय्याने अभिषेक climb करू लागला. पहिल्या जवळच्या स्टेशनवर अभ्याच्या मागोमाग सुमुखही climb करुन पोहोचला आणि अमोल jumar च्या सहाय्याने पुढील सूत्र सांभाळायला वरती गेला.
Next स्टेशन पर्यन्तचा route direction बदलून डाविकडे वळून निवडूंगात जाणारा आणि दरम्यान peg ठोकत आणि loose rock चा सामना करत जाणारा होता. ह्या प्रकारच्या माहुली special climbing ला टक्करीचे उत्तर देत आणि प्रसंगी थोडक्यासाठी घेतलेल्या fall बद्दल स्वत:शी झगडून अभ्या second station ला पोहोचला.
इथपर्यंत येइस्तोवर लागलेली कसोटी पाहता पुढे होण्याआधी मदतीला second man सुमुख ला jumar वर वरती घेतलं आणि scree avoid होईल असा patch शोधून पुढील climb सुरु झालं. जवळपास ६० एक फुटच राहिले होते. दरम्यान नेहा, मी, प्रतिक, प्रविण, सुयोग, पल्लवी यांना राजने आमच्या प्रेक्षक गृहाच्या आरामातल्या जागेवरून हालवून हॉट डॉग च्या विरुद्ध बाजूस असलेल्या शिखराच्या बेस पर्यन्त नेले होते. तिथून अख्ख्या climbing चे आणि wind up चे एकेक काय अस्सल भारी photos मिळालेत म्हणून सांगू! बरं, एवढ्यावर न थांबता लवकर आटोपलेलं हॉट डॉग wind up होताक्षणीच् हे सुद्धा pinnacle सर करायचं असं म्हणत झपाटल्यागत तहानभूक विसरलेले तिघं ५ एक मिनटात याही base ला पोहोचले. इथपासून उरलेलं अगदी १५० फुटांचं pinnacle ४ च्या आत सर झालंदेखील!
Bonus Pinnacle, Mahuli
Note: या pinnacle चे नाव मात्र माहिती नसल्यामुळे सद्ध्या त्याला Bonus pinnacle म्हटले आहे.. ज्या जाणकारांनी तो ओळखला असेल त्यांनी नाव नक्की कळवावे!
